मार्च २०१८ पर्यंत महाराष्ट्रावरचे कर्ज आहे ३,९६,००० कोटी रुपये. यात दरवर्षी भर पडत आहे
२०१२ ते २०१७ या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्र राज्याने १,७२,००० कोटी रुपयांचे कर्ज काढले. म्हणजे दरवर्षी सरासरी ३४,४०० कोटी रुपये. त्याच काळात महाराष्ट्र राज्याने व्याज व मुद्दलाची परतफेड या दोन्हीसाठी मिळून १,५३,००० कोटी खर्च काढले. म्हणजे दरवर्षी सरासरी ३०,६०० कोटी रुपये. म्हणजे जेव्हढे कर्ज काढले, त्याची ९० टक्के रक्कम आधीचे कर्ज फेडण्यात आणि त्यावरील व्याज भरण्यात कामी आली.......